सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न   

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या मॉडेलला गुरूवारी ताब्यात घेतले. तिच्याविरोधात बेकायदा खासगी मालमत्तेत घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला नोटीस देऊन सोडण्यात आले. सुरक्षा रक्षक व पोलिसांची नजर चुकवून सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये या मॉडेलने प्रवेश केला होता. ही मॉडेल सलमानच्या घरात घुसण्याच्या प्रयत्नात असतानाच तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिचा कोणताही घातपाताचा हेतू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला नोटीस देऊन सोडण्यात आले. 

Related Articles